Posts

३. सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा

कोविड-19 व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

यापूर्वी आलेल्या लाटांच्या काळात दाखवलेल्या सहकार्याच्या भावनेने केंद्र आणि राज्यांनी काम सुरु ठेवण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केले आहे. देशातील काही राज्यांमध्ये अलीकडेच कोविड रुग्णसंख्येत झपाट्‌याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचा आणि राज्यांमधील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विविध राज्यांचे आरोग्यमंत्री आणि प्रधान सचिव/ अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी आज संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार देखील उपस्थित होत्या. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्यांना दक्ष राहण्याचा आणि कोविड-19 व्यवस्थापनासाठी सर्व प्रकारची सज्जता ठेवण्याचा सल्ला दिला. 8 आणि 9 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या सज्जतेचा आढावा घ्यावा आणि 10 आणि 11 एप्रिल रोजी सर्व आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन करावे अशी विनंती त्यांनी राज्यांच्या आरोग्यमंत्र्याना केली. ILI/SARI रुग्णांच्या प्रमाणाचा कल लक्षात घेऊन तयार होणारे हॉट स्पॉट्स ओळखावेत आणि कोविड-19 आणि एन्फ्ल्युएझाच्या चाचण्यांचे पुरेसे नमुने पाठवावेत आणि पॉझिटिव्ह नमुन्यांचे संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण वेगाने करावे, अशा सूचनाही त्यांनी राज्यांना दिल्या.

23 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दशलक्ष चाचण्याची सरासरी राष्ट्रीय सरासरीच्याही खाली असल्याचे दिसून आले आहे. सध्या आढळणारे कोविडचे उत्परिवर्तक नवीन असले तरीही चाचणी- मागोवा-उपचार-लसीकरण आणि कोविड प्रतिबंधासाठी अनुरुप वर्तन ही पंचसूत्रीच कोविड व्यवस्थापनाचे सिद्ध झालेले धोरण राहील, असे मांडविया यांनी स्पष्ट केले. यामुळे योग्य प्रकारच्या आरोग्यविषयक उपाययोजना हाती घेणे शक्य होईल, असे ते म्हणाले. 7 एप्रिल 2023 रोजी संपलेल्या आठवड्‌यात नोंद झालेल्या प्रति दशलक्ष 100 या चाचणीच्या सध्याच्या दरात अतिशय वेगाने वाढ करण्याची विनंती देखील राज्यांना करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. चाचण्यांमध्ये RT-PCR चा वाटा वाढवण्याच्या सूचनाही राज्यांना करण्यात आल्या आहेत.

7 एप्रिल 2023 रोजी संपत असलेल्या आठवड्‌यातील नोंदीनुसार दैनंदिन रुग्णसंख्येची सरासरी, 17 मार्च 2023 रोजीच्या आठवड्‌यातील 571 वरून 4188 वर पोहोचली असून भारतात कोविड- 19 रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होऊ लागली असल्याची माहिती राज्ये केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली. 7 एप्रिल 2023 रोजी संपणाऱ्या आठवड्‌यात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 3.02% झाला आहे. मात्र, याच काळात जगामध्ये दैनंदिन रुग्णसंख्येची सरासरी 88,503 झाली आहे ज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण असलेल्या पाच देशांचे गेल्या आठवड्‌यातील जागतिक रुग्णसंख्येत 62.6% इतके योगदान आहे.

रुग्णालयीन सेवा

प्रस्तावना

राज्यात आरोग्य सेवा संचालनालयमार्फत प्रतिबंधात्सक व उपचारात्मक सेवा उपकेंदे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपविभाग हाणालये, जिल्हा रुग्णालये, स्वी रुग्णालये व सामान्य रुग्णालये मार्फत पुरविण्यात येतात या केदामध्ये आरोग्य सुविधा व उपचार प‌द्धती नवीन उपचारदवारे देण्यात येतात रुग्णालय यांचे काळानुरूप बेनीवर्धन करून त्याच्या ईमारती मध्ये आवश्यक बदल करण्यात येतात जेणेकरून रुग्णाना योग्य व त्वरित उपचाराच्या सुविधा प्राप्त होतात. जिल्हा रुग्णालये उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण अणालये वैथे स्रणाना सदर्भ सेवा उपलब्ध करून दिले जातात. या रुग्णालयाचे राज्यस्तरावरुन नियत्रण केले जाते. याचे अत्यंत प्रभावशाली परिणाम समोर आले आहेत.

उददेश

रुग्णांना दद्वितीय संदर्भा सेवा देण्यासाठी प्रथम व दवितीय सदर्भ सेवा रुग्णालयांचे स्थापना करणे.

कार्यपद्धती

जिल्हा रुग्णालये, उप जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये व सामान्य रुग्णालये यांची स्थापना करणे व मान्यता प्राप्त निकषानुसार मनुष्यबळ साधनसामुग्री व अनुदान वितरण करणे.

आरोग्य सुविधा

जळीत कक्ष

भाजेलल्या रुग्णाना वेळत उपचार देण्यासाठी खास जळीत कक्षाची स्थापना रुग्णालये मध्ये करणात आली आहे.

ट्रामा युनिट

अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी विभाग कक्ष उपलब्ध असून अपघात यस्ताना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात एकूण ६८ रुग्णालयात ट्रामा केयर यूनिट मंजूर करण्यात आलेली आहेत त्यापैकी २५ ट्रामा केयर यूनिट सध्या कार्यरत आहे.

अतिदक्षता कक्ष ICU

गभीर रुग्णांना उपचार करण्याकरिता ६ खाटाचा अतिदक्षता कक्ष १८ अतिरिक्त कर्मचारी वर्गासह कार्यान्वित करण्यात आला आहे त्या करिता आवशक यंत्र सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विशेष नवजात अर्भक काळजी कक्ष

कमी वजनात तथा अपूर्ण दिवसात जन्मलेले बालकाचा निगा अतिदक्षता कक्षात ठेऊन केल्यास मृत्यूचे प्रमाण बऱ्याच अशी कमी शक्य असते यास्तव राजयातील सर्व जिल्हा रुग्णालया मध्ये व स्त्री रुग्णालया मध्ये नवजात बालकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कक्षासाठी १० अतिरिक्त कर्मचारी वर्ग तमेच अवशक यत्र सामुग्री पुरवटा करणात आला आहे. सी. टी. स्कॅन राज्यात जिल्हा रुग्णालया मध्ये उपधारा करिता दाखल होणाऱ्या रुम्णा मधील जखमी रुग्णाना डोक्याला मार लागलेले करण मोठ्या प्रमाणात असतात अशा रुग्णाना तातडीने

सी टी स्कॅन

चाचणी करून त्याच्यावर वेळेत उपचार केल्यास जास्तीत जास्त व रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य असते वास्तव सर्व जिल्हा सणालये (वाशिम, पुणे वगळता व सामान्य रुग्णालये (मालेगाव वगळता) येथे ही सुविधा उपलब्ध आहे

मोबाइल मेडिकल यूनिट

दुर्गम भागात त्वरीत आरोग्य सेवा पुरवण्या करिता मोबाइल मेडिकल यूनिट स्थापना करणात आली आहे वरील सुविधा वरोबर सुरक्षा रुग्णवाहिका आहार स्वच्छता इत्यादि सेवा या रुग्णालयात उपलब्ध आहेत.

मनोविकृती कक्ष

राज्यात २३ जिल्हा रुग्णालये प्रत्यकी १० खतांचा मनोविकृती कक्ष सुरु करण्यात आलेला आहे.

सोनोग्राफी सुविधा

पोटातील रोगाचे अचूक निदान करण्यासाठी सर्व जिल्हा रुग्णालये, ७ स्त्री रुग्णालये, 3 सामान्य रुग्णालये येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्यात रुग्णासाठी औषधे व साधनसामुग्री साठा निकष पुढील प्रमाणे निश्चित करणात आले आहे.

रुग्णालयातील उपलब्ध सुविधा

अ) जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये व स्त्री रुग्णालये खालील सुविधा उपलब्ध आहेत.
  1. बाह्यरुग्ण विभाग
  2. आतरुग्ण विभाग
  3. माता व बाल संगोपन विभाग
  4. तात्काळ उपचार कक्ष
  5. प्रयोगशाळा
  6. प्रसुतीगृह
  7. शस्त्रक्रिया गुह
  8. शवविच्छेदन विभाग
  9. वाहन सुविधा (रुग्णवाहिका)
  10. नवजात अर्भक काळजी कोपरा
  11. क्ष-किरण
  12. न्याय वैद्यकीय प्रकरणे
  13. नेत्र तपासणी
  14. कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया
  15. लसीकरण व कुटूंब कल्याण सुविधाबाबत समुपदेशन व निरोध वाटप
  16. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रामतर्गत आरोग्य सुविधा
  17. मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया
  18. एकात्मिक समुपदेशन व उपचार केंद्र, पालकांकडुन मुलांकडे संक्रमण प्रतिवध उपचार केंद्र
  19. रक्तपेढी व रक्त घटक विघटन केंद्र
  20. फिजीओथेरेपी
  21. अतिदक्षता विभाग
  22. आहार विभाग
  23. दंत विभाग
  24. मनोविकृती विभाग
  25. जळीत विभाग
  26. विशेष नवजात अर्भक काळजी कक्ष
  27. शुश्रूषा केंद्र
  28. ट्रॉमा केअर युनिट
ब) उपजिल्हा रुग्णालये (१०० खाटा) येथे खालील सुविधा उपल्ब्ध आहेत.
  1. बाह्यरुग्ण विभाग
  2. आतरुग्ण विभाग
  3. माता व बाल संगोपन विभाग
  4. तात्काळ उपचार कक्ष
  5. प्रयोगशाळा
  6. प्रसुतीगृह
  7. शस्त्रक्रिया युह
  8. शवविच्छेदन विभाग
  9. वाहन सुविधा (रुग्णवाहिका)
  10. नवजात अर्भक काळजी कोपरा
  11. क्ष-किरण
  12. न्याय वैद्यकीय प्रकरणे
  13. नेत्र तपासणी
  14. कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया
  15. लसीकरण व कुटूंब कल्याण सुविधाबाबत समुपदेशन व निरोध वाटप
  16. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य सुविधा
  17. मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया
  18. एकात्मिक समुपदेशन व उपचार केंद्र, पालकांकडुन मुलांकडे संक्रमण प्रतिबंध उपचार केंद्र
  19. रक्तपेढी
  20. फिजीओथेरेपी
  21. अतिदक्षता विभाग
  22. आहार विभाग
  23. मनोविकृती विभाग
  24. नेत्र शस्त्रक्रिय
क) उपजिल्हा रुग्णालये (५० खाटा) येथे खालील सुविधा उपलब्ध आहेत.
  1. वाहयरुग्ण विभाग
  2. आतरुग्ण विभाग
  3. माता व बाल संगोपन विभाग
  4. तात्काळ उपचार कक्ष
  5. प्रयोगशाळा
  6. प्रसुतीगृह
  7. शस्त्रक्रिया गुह
  8. शवविच्छेदन विभाग
  9. वाहन सुविधा (रुग्णवाहिका)
  10. नवजात अर्भक काळजी कोपरा
  11. क्ष-किरण
  12. न्याय वैदयकीय प्रकरणे
  13. नेत्र तपासणी
  14. कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया
  15. लसीकरण व कुटूब कल्याण सुविधाबाबत समुपदेशन व निरोध वाटप
  16. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रामतर्गत आरोग्य सुविधा
  17. मोठ्या व छोट्‌या शस्त्रक्रिया
  18. एकात्मिक समुपदेशन व उपचार केंद्र, पालकांकडुन मुलांकडे संक्रमण प्रतिवध उपचार केंद्र
  19. रक्त पुरवठा केंद्र
ड) ग्रामीण रुग्णालये येथे खालील सुविधा उपल्ब्ध आहेत.
  1. बाह्यरुग्ण विभाग
  2. आतरुग्ण विभाग
  3. माता व बाल संगोपन विभाग
  4. तात्काळ उपचार कक्ष
  5. प्रयोगशाळा
  6. प्रसुतीगृह
  7. शस्त्रक्रिया गुह
  8. शवविच्छेदन विभाग
  9. वाहन सुविधा (रुग्णवाहिका)
  10. नवजात अर्भक काळजी कोपरा
  11. क्ष-किरण
  12. न्याय वैद्रद्यकीय प्रकरणे
  13. नेत्र तपासणी
  14. कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया
  15. लसीकरण व कुटूंब कल्याण सुविधाबाबत समुपदेशन व निरोध वाटप
  16. राष्ट्रीय आरोग्य कार्यकामंतर्गत आरोग्य सुविधा
  17. मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया
  18. रक्त पुरवठा केंद्र
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य

राज्यातील गरीब व गरजु रुग्णांना आपल्या गावात आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी दुय्यम आरोग्य सेवा
सर्व ठिकाणी उपलब्ध करुन देणे.

Rate This Study Storm

Getting Info...

Post a Comment

Will try to reply you soon
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.